नागलवाडीच्या शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करा..तहसिलदारांना निवेदन..
चोपडा दि.०५(प्रतिनिधी) तालुक्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमूळे शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तसेच चोपडा तालुक्याचा नागलवाडी या गावात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ऐन पिकांचा काढणीचा वेळेस आलेल्या पावसाने येथील शेतकरी मेटाकुटीस आला व प्रचंड प्रमाणात नुकसान झाले तरी मा. तहसीलदार सो,.चोपडा यांना लेखी निवेदन देण्यात आले. चोपडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व विमा कंपन्या कडून देखील नुकसान भरपाई मिळावी तसेच शेती पिकांचे पंचनामे करण्यात यावे व मा.तहसीलदार साहेब यांनी शेतकऱ्यांनची परिस्थिती शासन दरबारी मांडावी अशी विनंती नागलवाडी येथील शेतकऱ्यांनी केली या प्रसंगी चोपडा येथील नगर सेवक श्री.प्रकाश मोहन राजपूत,नागलवाडी येथील सरपंच प्रताप शेणपडू भिल,उपसरपंच सचिन पाटील ग्रामपंचायत सदस्य गोपाल पाटील ,तसेच शेतकरी संदीप पाटील,रमेश पाटील व इतर शेतकरी हजर होते.