शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलच्या एनसीसी कॅडेट्सची आरोग्य तपासणी..ग्रामीण रुग्णालयाचे अनमोल सहकार्य*






शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलच्या एनसीसी कॅडेट्सची आरोग्य तपासणी..ग्रामीण रुग्णालयाचे अनमोल सहकार्य* 


धरणगाव ,दि.०६ ( प्रतिनिधी) योगेश पाटील  येथील एकशे सात वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलच्या राष्ट्रीय कॅडेट कोर अर्थात एनसीसी मध्ये या शैक्षणिक वर्षात भरती करण्यात आलेल्या २४ मुली आणि ३३ मुले अशा ५७ एनसीसी कॅडेट्सची आरोग्य तपासणी ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने करण्यात आली. मुलांमध्ये राष्ट्रभावना वाढीस लागावी, त्यांना सैन्यदलाविषयी आकर्षक वाटावे, यासाठी भारत सरकारने महाराष्ट्रातील मोजक्याच शाळांमध्ये राष्ट्रीय कॅडेट कोर एनसीसी विभाग सुरू केला आहे.गेल्या काही वर्षापासून बोटावर मोजता येतील इतक्या शाळांमध्ये मुलींसाठीही एनसीसी सुरू झालेली असून मुलींसाठी एनसीसी असलेली पी.आर.हायस्कूल ही जिल्ह्यातील शाळा आहे.मेजर डी.एस.पाटील हे एनसीसी विभाग सांभाळत आहेत. 

आज आठवीतील एनसीसी कॅडेट्स मुलं मुलींची वैद्यकीय तपासणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील, डॉ.गिरीश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग शाळेतील भाग्यश्री कांबळे, अतुल पाटील, विजय पाटील यांनी सहकार्य केले. शाळेचे मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे,उपमुख्याध्यापक आर. के. सपकाळे, पर्यवेक्षक डॉ.सौ.आशा शिरसाठ यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे. शाळेचे कर्मचारी प्रवीण तिवारी,मिलिंद हिंगोणेकर आणि जितेंद्र दाभाडे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने