झटपट पोलखोल बातमीचा इफेक्ट...चिमठाणे - बुराई नदी पुलावर भरावाचे काम झाले तात्काळ

 


झटपट पोलखोल बातमीचा इफेक्ट...चिमठाणे - बुराई नदी पुलावर भरावाचे काम झाले तात्काळ 



चिमठाणे  दि.5(प्रतिनिधी -प्रविण भोई )

चिमठाणे बुराई नदीवरील पुलावर साईडपट्टीचा भराव खचल्याने कंटेनर फसला.... झट पट पोलखोल न्युज ने या आशयाचे वृत्त 2 तारखेला प्रकाशित केले होते...या वृत्ताची दखल घेत संबधित विभागाने तात्काळ दखल घेऊन बुराई नदीवरील पुलावर चिमठाणे कडून डाव्या बाजूस हा भराव खचला होता.त्यात कंटेनर फसला होता....त्या ठिकाणी संबंधित विभागाकडून  दगड मुरूमचा भराव करून खचलेला भाग पूर्ववत करण्यात आला...


रस्त्यावरील खड्डे केव्हा पूर्ववत होणार?


......हा खचलेला भाग भरला गेला असला तरी सोनगीर दोंडाईचा रस्त्यावरील खड्ड्यांची स्थिती जैसे थे आहे...पुलाच्या दोन्ही बाजूस खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत....वाहन धारकांची खूप अवहेलना होत आहे...वाहन धारकांना वाहन चालवताना खूप तारेवरची कसरत करावी लागते.. या कडे पण अशाच तत्परतेने रस्त्याची दुरुस्ती होणें गरजेचे आहे...जेने करून होणाऱ्या अपघातांना आळा बसेल....व वा वाहनधारकांचा प्रवास सुखाचा होईल...सोनगीर दोंडाईचा रस्त्यावरील खड्ड्यांचा विचार केला तर..खड्ड्यांची सुरुवात सोनगीर फाट्याच्या पुढून होते तर सोडले ,डागुर्णे,च्या पुढे तर खड्डयांची रेसच लागलेली दिसते...दराने फाट्याच्या जवळ चिमठाणे बुराई नदीवरील पुलावर पूर्ण खड्डेच खड्डे आहेत...पेडकाई पेट्रोलपंप च्या पुढे ,पेडकाई देवी मंदिराच्या पुढे तर खड्डेच खड्डे  रस्त्यावर पडले आहेत....अशा प्रकारे पूर्ण सोनगीर ते दोंडाईचा रस्ता खड्डेमय झाल्याचा आपल्याला दिसेल....संबंधित विभागाने या कडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करावी  अशी परिसरातून मागणी होत आहे........

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने