आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नांना यश ,दापोली उपजिल्हा रूग्णालयात 100 खाटांच्या इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता*


 *आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नांना यश ,दापोली उपजिल्हा रूग्णालयात 100 खाटांच्या इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता*


रत्नागिरी,दि.०५(प्रतिनिधी सुशीलकुमार पावरा):महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक प्रशामा-2021 /प्र.क्र.199/आरोग्य 3-अ मंत्रालय मुंबई दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजीच्या शासननिर्णया नुसार दापोली जिल्हा रत्नागिरी येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या इमारत बांधकाम अंदाजपत्रक व आराखड्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती दापोली मतदासंघाचे आमदार योगेश कदम यांनी दिली.

          आमदार योगेश कदम यांनी दापोली येथील शिवसेना कार्यालयात आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण केलेल्या विकास कामांची माहिती दिली.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दापोली जिल्हा रत्नागिरी येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयात श्रेणीवर्धीत बांधकामाच्या अंदाजपत्रकास निधी उपलब्ध करण्याच्या मागणीचे आमदार योगेश कदम यांनी दिनांक 8 सप्टेंबर 2021 रोजी पत्र दिले होते.

आमदार योगेश कदम यांनी वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणी नुसार शासननिर्णया नुसार दापोली जिल्हा रत्नागिरी येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या इमारत बांधकामास रूपये 2021.34 लक्ष इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

           पत्रकार परिषदेत आमदार योगेश कदम यांनी पुढील विकास कामांची माहिती सुद्धा दिली. यावेळी अण्णा कदम जिल्हा परिषद सदस्य,सदानंद चव्हाण शिवसेना पदाधिकारी,दापोली तालुका शिवसेना अध्यक्ष व इतर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार योगेश कदम यांनी केलेल्या या विकास  कामांबद्धल सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने