*अनवर्दे खु येथे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत डिजिटल 7/12 घरपोच वाटप*





 *अनवर्दे खु येथे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत डिजिटल 7/12 घरपोच वाटप* 

विचखेडा, ता. चोपडा (प्रतिनिधी चंद्रकांत पाटील):*मंडळ भाग हातेड मधील अनवर्दे खु या गावी अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मोफत डिजिटल स्वाक्षरी सातबारा घरपोच वाटपाचा शुभारंभ  करतांना आर आर महाजन मंडळ अधिकारी हातेड, गजानन पाटील तलाठी अनवर्दे खु || आशिष निचित तलाठी हातेड बु यांच्या शुभहस्ते करण्यात आला.तसेच तालुक्यातील इतर सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी मोफत 7/12 वाटपास शुभारंभ केला आहे.पेसा तलाठी अमिन तडवी यांनी देखील पाडा व वस्त्यांवर जावुन घरपोच सातबारा वितरीत केले .हातेड भाग,गोरगावले भाग ,धानोरा भाग ,अडावद भाग,लासुर व चोपडा भागातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मोफत 7/12 वितरण केले व त्याचबरोबर इतर महसुली योजनांची माहिती तसेच ई पिकपाहणी व ई  पिकपाहणी न झालेल्या खातेदारांच्या यादीचे वाचन करण्यात आली  ,याबाबत माहिती देण्यात आली  .डिजिटल स्वाक्षरित 7/12 ची सुधारित प्रत (फक्त एकदाच) सर्व खातेदारांना मोफत पुरविण्यात येणार आहे.सध्या या अनुषंगाने 7/12 pdf जनरेशन चे कामदेखील तलाठी मंडळ अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येत असुन लवकरच सुधारित 7/12 ची मोफत प्रत  प्रत्येक खातेदारापर्यंत तलाठी मार्फत घरपोच मिळणार आहे.पी टी एस विद्यालयाचे माजी चेअरमन संतोष उखा पाटील, माजी सरपंच अरुण अमरसिंग पाटील ,रोहिदास(गणेश) साहेबराव पाटील, गोकुळ रुपचंद शिरसाठ ,ज्ञानेश्र्वर बाबुराव बोरसे, विनोद पवार प्रकाश बोरसे, दिनेश अहिरे,तात्या शिरसाठ भरत शिरसाठ भुषण शिरीष बोरसे जगदीश तायडे सुधारीत 7/12ची प्रत खातेदार यांना घरपोच देण्यात आल्या

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने