जिल्हा पंचायत नियोजन समितीची स्थापना.. 15 सरपंचांची निवड..चोपडयातून पुनगांवचे सरपंच किशोर मुरलीधर बाविस्कर यांची वर्णी
चोपडा दि.०२ ( प्रतिनिधी):जिल्हा पंचायत नियोजन समिती सदस्य साठी जिल्ह्यातून 15 सरपंचांची निवड करण्यात आली, प्रत्येक तालुक्यातून एक सदस्य चोपडा तालुक्यातून पुनगांव येथील सरपंच किशोर मुरलीधर बाविस्कर यांची निवड करण्यात आली.
पंधाराव्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्हा परिषद विकास आराखडा (डिपीडिसी) तयार करण्याबाबत मार्गदर्शक सुचनानुसार जिल्हा पंचायत नियोजन समितीची स्थापना, तसेच क्षेत्रीय कार्यगट स्थापन करण्याबाबत १ ऑक्टोबर रोजी विशेष जि.प. सर्वसाधारण सभा ऑनलाईन झाली होती. सभेच्या अध्यक्ष स्थानी जि. प. अध्यक्षा रंजनाताई प्रल्हाद पाटील होत्या. या सभेस ऑनलाईन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच विभाग प्रमुख अधिकारी त्याचप्रमाणे जि. प. सदस्य, सदस्या हे होते. सदर सरपंच या प्रमाणे १५ सरपंच यांचे नावाची निवड सभेत १५ वा वित्त आयोगांतर्गत जिल्हा परिषद करण्यात आली आहे.
या समितीत जिल्ह्यातील १५ सरपंचांचा समावेश करण्यात आला आहे ते पुढीलप्रमाणे.. प्रकाश यशवंत पाटील सरपंच ग्रा.प. वाकडी ता. चाळीसगांव, श्रीमती पुनम गोपाल पाटील सरपंच ग्रा. प. सावरखेडा ता. पारोळा, मिलींद दत्तात्रय चौधरी सरपंच ग्रा.प. भादली बु. ता. जळगांव, राहूल रामराव पाटील सरपंच ग्रा. पं. राजरी खु. ता. पाचोरा, किशोर मुरलीधर पाटील सरपंच ग्रा. प. पुनगांव ता. चोपडा, कल्पना विकास पाटील सरपंच ग्रा.प. पिंपळगांव बुता जामनेर, मोहन सुधाकर महाजन सरपंच ग्रा.प. नरखले ता. मुक्ताईनगर, भास्कर भिमराव पाटील सरपंच ग्रा.प. बात्सर वा भडगांव, विकास नवल सोनवणे सरपंच ग्रा.प. खडकेसिम ता. एरंडोल, श्रीमती मिराबाई प्रकाश पाटील सरपंच ग्रा.प. खंडाळा ता. भुसावळ, सदस्य श्रीकांत साहेबराव कोळी सरपंच ग्रा.पं. सुरवाडे बु. ता. बोदवड, श्रीमती सुनंदा रमेश पाटील सरपंच ग्रा. प. भामर्डी ता. धरणगांव