वालखेड़ा ग्रामपंचायत उपसरपंच पदी भगवान (रावसाहेब)येळवे यांची निवड



 


*वालखेड़ा ग्रामपंचायत उपसरपंच पदी भगवान (रावसाहेब)येळवे  यांची निवड*

 वालखेडा:- (प्रतिनिधी संदिप येळवे )

शिंदखेड़ा तालुक्यातील वालखेड़ा येथील कॉंग्रेस पक्षातील श्री भगवान गुलाब येळवे  (कोळी)यांची वालखेड़ा ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी   कस्तूरंग  शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ,मा. उपसभापति पं. स.शिंदखेड़ा श्री किशोर रंगराव पाटील,सरपंच लक्ष्मण माळचे,ग्रामपंचायत सदस्य, मा. पंचायत समिती सदस्य ,तंटामुक्ति अध्यक्ष शानाभाऊ येळवे, भालेराव  येळवे साहेब ,माजी सरपंच दिलीप येळवे, माजी सरपंच कैलास ठाकरे,अशोक नाना ,बारकू वानखेड़े,  युवा नेते वैभव (राज) ठाकरे,सुभाष दादा,विनायक येळवे,सचिन  येळवे,संदीप येळवे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते व माजी आमदार कै.रंगराव माधवराव पाटील यांच्या समाधी स्थळ येथे जाऊन फुलहार अर्पण करून आदरांजली दिली व त्यानंतर गावात मिरवणूक केली व घरोघरी जाउन लोकांचे आशीर्वाद घेतले शेवटी भवानी माता येथे जाऊन  आशीर्वाद घेतला व त्यावेळी उपसरपंच भगवान गुलाब येळवे यांनी गावाचा विकास याकडे अधिक लक्ष दिले जाईल येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा च जिल्हा परिषद सदस्य असेल गांव व खलाने गट चा विकास हा कॉग्रेस पक्षा कडून होईल असे मत मांडले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने