*१२ तासाच्या आत दुचाकी चोर जेरबंद.. समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाची झटपट कारवाई.. अन्य मासे गळ्याला लागण्याची शक्यता..!*

 


*१२ तासाच्या आत दुचाकी चोर जेरबंद.. समर्थ पोलीस स्टेशन  तपास पथकाची झटपट कारवाई.. अन्य मासे गळ्याला लागण्याची शक्यता..!* 


सातारा दि.५(जिल्हा प्रतिनिधी संभाजी गोसावी)

दि. ०४/०८/२०२१ रोजी फिर्यादीने त्यांची हिरो होंडा कंपनीची पॅशन प्लस मोटार सायकल चोरी झालेबाबत तक्रार दाखल केली होती. समर्थ पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे आदेशाने तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी वाहन चोरीला प्रतिबंध होणेकामी व वाहन चोर पकडणेकामी प्रट्रोलींग करीत असतांना एक इसम निशात टॉकिज समोरुन हिरो होंडा पॅशन प्लस गाडीनंबर एम एच १२ एफजे ६९४ वरून संशयीत रीत्या जाताना दिसला. सदरच्या गाडीचा संशय आल्याने त्यास थांबवून त्याचेकडे गाडीचे कागदपत्राबाबत विचारणा केली असता, तो असमाधानकारक व उडवाउडवीची उत्तरेदेवु लागला म्हणुन त्यास त्याचा नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव निलेश बाळु नेटके रा. एसआरओ बिल्डींग नं. ओ/३ घरनं. ४१६, १०४९ न्यु नाना पेठ पुणे असे असल्याचे सांगितले.


त्यास अधिक चौकशी कामी समर्थ पोलीस स्टेशन येथे आणले व गाडीच्या चॅसीस व इंजिन नंबर वरून खात्री केली असता सदर गाडीचा ओरीजनल आर.टी.ओ. नंबर एम. एच. १२ एफजे ०४३१ असे असल्याचे निष्पन झाल्याने सदर गाडीबाबत अभिलेख पडताळुन खात्री केली असता समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १३३/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाख असलेचे समजले. त्याबाबत त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरची गाडी तो रहात असलेल्या बिल्डींगच्या पार्किंग मधुन चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर आरोपीस दाखल गुन्हयात अटक केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस नाईक सुभाष पिंगळे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, मा. श्रीमती प्रियंका नारनवरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर, मा. श्री. सतिश गोवेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे श्री. विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे. उल्हास कदम, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनानुसार सहा. पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस अंमलदार संतोष काळे, सुशील लोणकर, हेमंत पेरणे, सुमित खुट्टे, सुनिल हसबे, सुभाष पिंगळे, विठ्ठल चोरमले, निलेश साबळे, सुभाष मोरे, श्याम सुर्यवंशी यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने