ग्रामपंचायतीच्या शिपायाकडून २ हजाराची लाच घेतांना धरणगाव पंचायत समिती विस्तार अधिकारींसह ग्रामसेवक लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात.. चोपडयात मानसी हाॕटेलात अडकले दोघे*

 



*ग्रामपंचायतीच्या शिपायाकडून  २ हजाराची लाच घेतांना धरणगाव पंचायत समिती विस्तार अधिकारींसह ग्रामसेवक लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात.. चोपडयात  मानसी हाॕटेलात  अडकले दोघे* 

चोपडा;दि.३० (प्रतिनिधी)- ग्रामपंचायतीच्या शिपायास सन 2015-16 या कालावधीत जादा वेतन दिले गेले. जादा वेतनाच्या रकमेच्या परतफेडीसाठी मिळालेल्या नोटीसप्रकरणी जिल्हा परिषदेकडे अनुकुल अहवाल पाठवण्यासाठी दोन हजाराची लाच तक्रारदार शिपायास मागण्यात आली होती.

धरणगाव पंचायत समिती विस्तार अधिकारी सुरेश शालिग्राम कठाळे व कंडारी बुद्रुक ता. धरणगाव येथील ग्रामसेवक कृष्णकांत राजाराम सपकाळे या दोघांनी प्रत्येकी एक हजार असे एकुण दोन हजार रुपये तक्रारदार शिपायाकडे मागितले होते. ग्रामसेवक कृष्णकांत सपकाळे याने सदर लाचेची रक्कम हॉटेल मानसी चोपडा येथे तक्रारदाराकडून घेताच दबा धरुन बसलेल्या एसीबी पथकाने त्याच्यावर झडप घातली. या प्रकरणी सुरेश शालिग्राम कठाळे व कृष्णकांत सपकाळे या दोघांना एसीबी पथकाने ताब्यात घेत पुढील कायदेशीर प्र राबवली. एसीबीचे पोलिस उप अधिक्षक शशिकांत पाटील, पो. नि. संजोग बच्छाव, स.फौ. दिनेशसिंग पाटील, सफ़ौ सरेश पाटील  पोहेकॉ. अशोक अहीरे,पोहेकॉ. सुनिल पाटील, पोहेकॉ. रविंद्र घुगे, मपोहेकॉ. शैला धनगर, पोना. मनोज जोशी, पोना. सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पो.कॉ. महेश सोमवंशी, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ. ईश्वर धनगर,पोकॉ. प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने