*हडपसर पोलीसांनी
मोटारसायकल चोरी करणा-या टोळीच्या आवळल्या मुसक्या.. १० मोटारसायकलींसह एक आॕटो रिक्षा जप्त.. साडे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत .. ३ चोरटयांना अटक*
पुणे दि.३०(संभाजी गोसावी)हडपसर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी मोटार सायकल चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या . त्यांच्याकडुंन एकुण 10 मोटार सायकली सह एक अँटो रिक्षा ताब्यांत घेवुन तीन आरोपी जेरबंद . सहा . फौजदार अविनाश गोसावी साहेब यांच्या धडाकेबाज कामगिरीबदल त्यांचे नमो नारायण ग्रुप व पुरीगोसावी परिवारांकडुंन आभिनंदन होत आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की,हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहनचोरीच्या घटनेत वाढ झाल्याने वरिष्ठांच्या आदेशाने व मार्गदर्शानुसार वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्याकरिता दिलेल्या सुचनाप्रमाणे दिनांक २९/०७/२०२१ रोजी १५/०० वाजताचे सुमारास हडपसर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस हवा. प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षिरसागर, पो.ना. अविनाश गोसावी, समीर पांडूळे, पो.शि. अकबर शेख, शाहीद शेख, प्रशांत टोणपे, शशिकांत नाळे, निखील पवार, प्रशांत दुधाळ असे दोन पथकासह गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पो.उप निरी, सौरभ माने आणि पो.ना. अविनाश गोसावी यांना एक संशयित इसम हा ससाणेनगर परीसरात कॅनॉलचे पुलावर क्रमांक नसलेल्या एका स्प्लेंडर मोटारसायकलवर थांबला होता. त्याचा तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना संशय आल्याने यांनी त्यास विचारपूस करणेस सुरवात केली त्यावेळी तो कावरा बावरा होवून उडवा उडवीचे उत्तरे देवू लागला. त्यास अधिक विचारणा केली असता त्याने त्याचे सोबतचे दोन साथीदार हे बाजूला हात दाखवून मोटार सायकल आणणेकरीता आत गेले असल्याचे सांगितले. त्यांनी दिलेली माहिती ही संशयास्पद वाटत असल्याने त्याचा मोबाईल फोन ताब्यात घेवून त्याचे दोन साथीदारांची वाट पाहत पथकातील अधिकारी अमलदार यांनी कॅनॉलच्या पुलावर सापळा लावला. त्याचवेळी त्याठिकाणी इतर पेट्रोलिंगचे पथकास बोलावून त्यांना देखील सदर सापळा कारवाईमध्ये समाविष्ठ करून घेण्यात आले. सुमारे अर्ध्या तासानंतर त्याचे दोन साथीदार एका शाईन मोटारसायकल तिचा क्रमाक एम.एच.१२/ एल. क्यू/५१८३ वरून तो थांबलेल्या ठिकाणी आले. त्याचवेळी पथकातील अधिकारी अंमलदार यांनी लागलीच त्यांना ताब्यात घेवून दोन मोटारसायकली सह हडपसर पोलीस ठाणे येथे आणले. त्यांना विश्वासात घेवून त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी (१) महेश लक्ष्मण धुमाळ वय २३ वर्ष, रा. आंबेगाव ता. दौंड जिल्हा पुणे (२) प्रतिक संदीप काळे, वय २१ वर्ष रा. वेताळनगर केडगाव ता. दौंड जिल्हा पुणे (३) महेश दिलीप जगताप वय २३ रा. मळईवस्ती, कडेठाण ता. दौंड जिल्हा पुणे असे सांगितले. त्यांना मोटार सायकली बाबत विचारणा केली असता त्यांनी दोन्ही मोटारसायकल हया चोरी केलेल्या असून त्यातील एक मोटारसायकल ही गोंधळेनगर येथून चोरी केली आहे. त्याच मोटारसायकल वरून ट्रिपल शिट येवून दुसरी गाड़ी चोरून घेवून जाणेकरीता ससाणेनगर परीसरात आलो. तेथे महेश जगताप यास चोरीच्या गाडीसह कॅनॉलच्या पुलावर थांबून त्याचे दोन साथीदार महेश धुमाळ आणि प्रतिक काळे हे दुसरी गाड़ी चोरी करणेकरीता गेले. त्या दोघांनी तेथून एक शाईन मोटारसायकल चोरी करून आणली असल्याची माहिती दिली. दोन्ही मोटारसायकल बाबत माहिती घेतली असता हडपसर पोलीस ठाणे येथे अनुक्रमे (१) हडपसर पोलीस ठाणे गु.रजि. नं. ५७४/२०२१ भा.द.वि. ३७९ (२) हडपसर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५७२/२०२१ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले.
वरील आरोपी हे मोटारसायकल चोरीच्या गुन्हयात सराईत असल्याचे गृहीत धरून त्यांचेकडे विश्वासात घेवून अधिक तपास केला असता त्यांनी नमूद केलेप्रमाणे मोटारसायकल व रिक्षा चो-या केल्या असल्याची कबूली दिलेली आहे. त्यांचेकडून गुन्हे उघड झालेले आहेत.