*शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथील खजिना लुट क्रांती स्मारक थोर स्वातंत्रसिनिक सन्मानासाठी काग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले* *यांच्या आगमनानिमित्त बैठकीचे आयोजन उपस्थितीचे आवाहन-* *जिल्हाध्यक्ष शाम सनेर* शिंदखेडा दि.३१ तालुका प्रतिनिधी ( यादवराव सावंत ) देशाच्या स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या "व्यर्थ न हो बलिदान" या विशेष अभियानाबाबत उद्या दुपारी दोन वाजता धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीचे तातडीची बैठक आयोजित करत आहे देशाच्या स्वातंत्र्याला 74 वर्षे पूर्ण होऊन 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहोत, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहासात काँग्रेस हा अविभाज्य घटक आहे हा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिनांक 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2021 पर्यंत विविध कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, या माध्यमातून तरुणांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी स्वातंत्र्य चळवळीचा खरा इतिहास लोकांसमोर यावा. स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचा सहभाग अधोरेखित व्हावा या उद्देशाने "व्यर्थ न हो बलिदान" हे अभियान सुरू करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य लढ्यातील एक ऐतिहासिक व क्रांतिकारक घटना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणा (साळवे) या ठिकाणी खजिना असल्याचा प्रकार घडला खरा लुटीचा एतिहासिक उपक्रम आपल्या जिल्ह्याच्या इतिहासात नोंद झाला आहे 7 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नानासाहेब पटोले या क्रांतिकारक स्मारकाला अभिवादन करण्यासाठी व थोर स्वातंत्र्यसेनानी सन्मान करण्यासाठी येणार आहेत या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी उद्या दुपारी दोन वाजता आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर बैठकीस माजी मंत्री रोहिदास पाटील डॉ. नानासाहेब देशमुख माजी खासदार बापू चौरे किशोर पाटील माजी आ वसंतराव जोशी माजी आप्राध्यापक शरद पाटील रमेश रमेश श्रीखंडे साबीर शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे तरी धुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, विभागाचे प्रमुख तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांनी बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर व शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष युवराज करणंकाळ यांनी केले आहे