*अमळनेरला राहुल गांधी विचारमंच संघटनेचा .. दुसरा वर्धापनदिन साजरा..*
अमळनेर दि.२६(प्रतिनिधी):दि. २५ जुलै रोजी राहुल गांधी विचार मंच संघटनेच्या २ऱ्या वर्धापनदिन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ कोचे, राष्ट्रीय समन्वयक आणि महाराष्ट्र प्रभारी कु. दिपालीताई मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव जिल्हा राहुल गांधी विचार मंच संघटनेच्या वतीने अमळनेर येथे विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९:३० वाजता शिवाजी उद्यानातील छ. शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. रहेमान खाटीक, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. संतोष पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कांग्रेसचे जेष्ठ नेते श्री. विश्वासराव पाटील (शिरसाळेकर) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यानंतर शिवाजी उद्यानातच केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. दुपारी १२:०० वाजता अमळनेर ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णांना फळं आणि नाश्ता वाटण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. दुपारी २:३० वाजता ढेकू सीम रस्त्यावरील पोलीस मुख्यालयाच्या पाठीमागील टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण झाल्यानंतर बऱ्याच दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने सुमारे पाऊण तास जोरदार हजेरी लावून वृक्षारोपण सार्थक केले. यावेळी संबोधित करताना जिल्हा अध्यक्ष यांनी आपण केलेल्या वृक्षारोपणाने झाडांची जशी वाढ होईल तशी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या संघटनेची वाढ होवो अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच श्री विश्वासराव पाटील यांनीही मार्गदर्शन केले. तसेच नवनियुक्त पदाधिकारींचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी जिल्हा अध्यक्ष डॉ. रहेमान खाटीक, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. संतोष पाटील, कांग्रेस चे जेष्ठ कार्यकर्ते श्री. विश्वासराव पाटील अमळनेर तालुका अध्यक्ष राकेश पवार (प्रशांत पाटील), शहर अध्यक्ष भागवत बाविस्कर, शहर अल्पसंख्याक अध्यक्ष फिरोज शेख, शहर कार्याध्यक्ष मुन्ना पठाण, शहर उपाध्यक्ष बाळा साळुंके, शहर सचीव मो. शोएब शेख, शहर अल्पसंख्याक कार्याध्यक्ष गुलामुद्दीन शेख, माजी अल्पसंख्याक शहर अध्यक्ष काशिफ पठाण, प्रविण पाटील आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.