मुंबई, दि २५:-
राज्य सरकारने जाहीर केलेले सानुग्रह अनुदान ठाण्यातील रिक्षा चालकांना तातडीने मिळावे ह्यासाठी ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाने आधारकार्ड केंद्र सुरू केले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, नवीन इमारत द्रृतगती महामार्ग, एलआयसी इमारतीजवळ, लुईसवाडी, ठाणे-४००६०४ तसेच जुने प्रादेशिक कार्यालय, मध्यवर्ती कारागृहासमोर, कोर्ट नाका, ठाणे येथे ही आधारकार्ड केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
धडक कामगार युनियनचे नेते अभिजीत राणे ह़्यांनी ठाण्यातील रिक्षा चालकांचे मोबाईल नंबर आधारकार्डला लिंक नसल्याने त्यांना राज्य शासनाने जाहीर केलेले सानुग्रह अनुदान मिळण्यास व्यत्यय येत असल्याची बाब परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षांत आणून दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांना जाग आली.रिक्षा चालकांचे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी ही केद्रे सुरू केल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने राणे ह्यांना पत्र लिहून कळविले आहे.
................