*कृषि पदवीधर संघटना जिल्हा युवक कार्याध्यक्ष पदी फकिरचंद पाटील यांची निवड*
पाचोरा दि. 3(प्रतिनिधी) गिरड येथील फकिरचंद पाटील यांची कृषि पदवीधर संघटनेच्या जळगाव जिल्हा युवक कार्याध्यक्ष पदी निवड झाली आहे ते स्व.आर.एस बाफना कृषी तंत्र विद्यालयात कोल्हे ता .पाचोरा येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे कृषि पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृषिभूषण महेश कडूस पाटील व कृषि पदवीधर संघटनेच्या अध्यक्षा मंगल कडूस पाटील यांनी फकिरचंद पाटील यांची जळगाव जिल्हा युवक कार्याध्यक्ष पदी निवड केली तसेच सुरज.खोमणे.(प्रदेशाध्यक्ष महा.राज्य) मनिष भदाणे(प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी आघाडी महा.राज्य)राहुल राजपुत (कार्याध्यक्ष युवक उत्तर महाराष्ट्र प्रदेश)यांनी निवडीबद्ल कौतुक केले आहे तसेस पाचोरा भडगाव तालुक्यासह कौतुक होत आहे
तसेच कृषि पदवीधर संघटनेने जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी चोख पणे पार पाडेल व ह्यापुढे स्वयंसेवेने जळगाव जिल्ह्यातील पदवीधर युवक,विद्यार्थी तसेच शेतकरी कृषी क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेईल असे जळगाव जिल्हा कृषी पदवीधर संघटनेचे युवक कार्याध्यक्ष फकिरचंद पाटील हे म्हणाले.