चोपडा दि.22 ( प्रतिनिधी) चोपडा तालुका व्यापारी महामंडळ यांच्यातर्फे चोपडा तालुक्याचे तहसीलदार माननीय श्री अनिल गावित साहेब यांना निवेदन देण्यात आले जीवनावश्यक सेवा मधील दुकानावर सकाळी 7:00 ते 11:00 सुरू आहे त्याचप्रमाणे शहरातील जीवनावश्यक सेवा व संपूर्ण व्यापार दुकान यांना पण परवानगी 8:00 ते 1:00 वाजेपर्यंत देण्यात यावे यासंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले व्यापारी महामंडळ अध्यक्ष अमृतराज सचदेव,सल्लागार अनिल वानखेडे,संजय कानडे, उपाध्यक्ष सुनील बरडिया,श्याम सोनार,सचिव राजेंद्र जैन, प्रवीण जैन, नरेंद्र तोतला, प्रफुल स्वामी, विपिन बरडिया, सुंदरलाल सचदेव, संजय जैन, आदेश बरडिया,दिपक राखेचा,महाविर जैन,सिद्धार्थ पालीवाल,रवि अनंदाणी ,सचिन जैन महामंडळाचे पदाधिकारी व संचालक मंडळ उपस्थित होते
जीवनावश्यक वस्तूंसाठी वेळ वाढवा...! व्यापारी बांधवांचे चोपडयात निवेदन
Zatpat Polkhol News
0
Zatpat Polkhol News
खानदेशातील वाचकाचे चाहते वृत्तपत्र *"दैनिक जनशक्ती*" या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून 15 वर्षाच्या कारकीर्दीत समाज हिताचे लिखाण करून अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपुर्ण योगदान दिले आहे. वृत्तपत्र क्षेत्रात जाहिरात, बातम्या सर्वच विभागात कामाची हातोटी असल्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे राजकीय. सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय देऊन निस्वार्थी, निगर्वीपणे पुढे आलो आहे. शिवाय साप्ताहिक चौखंबा वृत्तपत्राचे उपसंपादक म्हणून काम केले आहे. "दिवाळी विशेषांक" खास शैलीत काढले आहेत. महाराष्ट्र 99 न्यूज चॅनेलचे उपसंपादक म्हणून कामगिरी बजावली आहे. आदिवासी, दिव्यांग दीन-दलित व वंचित समाज गोर गरिबांची सेवा अविरतपणे बजावित आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून जनतेला सेवा देण्यासाठी तत्पर आहे. भ्रष्टाचार, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी *"झटपट पोलखोल न्यूज"* लेखणी सुरूवात केली आहे.
भविष्यात सर्व सामान्य गोर गरिब व वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपुर्ण योगदान देणार असून अन्याय व भ्रष्टाचार विरोधी धारदार लेखनीने आवाज उठवून न्याय देण्यासाठी झिजणार आहोत. ग्रामीण भागातील विद्यार्थी, लोकांपर्यंत पोहोचून शासन योजना पोहचविण्याची मोलाची जबाबदारी पार पाडून जन जागृती अभियान राबविणार आहोत