तापी शेतकरी सहकारी सूतगिरणी संस्थेवर तीन संचालकांची वर्णी

 तापी शेतकरी सहकारी सूतगिरणी   संस्थेवर तीन संचालकांची वर्णी


चोपडा,दि.२७( प्रतिनिधी) तालुक्यातील खाचने शिवारात असलेल्या तापी शेतकरी सहकारी सूतगिरणी लि. या संस्थेवर नव्याने तीन संचालकांची निवड करण्यात आली आहे, तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या व्यवस्थापन मंडळात दोन संचालकांनी राजीनामे दिले असले तरी दिवंगत संचालक विनायक पाटील चहार्डी, यांचे निधन झाल्याने त्यांचे रिक्त जागी त्यांचे चिरंजीव- रामचंद्र विनायक सोनवणे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. संचालक हिरालाल  पाटील- यांचे जागेवर मनीलाल पटेल( कुसुंबा) यांना घेण्यात आले आहे. वेले येथील तज्ञ संचालकांच्या जागेवर- पंढरीनाथ जिंगा पाटील यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या मासिक बैठकीत वरील तीनही संचालकांचा निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बैठकीच्या प्रारंभी 26 /11 रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात शहीद झालेल्या पोलीस शिपायांना व मृत व्यक्तींना तसेच तालुक्यातील अजंती सीम येथील माजी सरपंचकै. विजय जगन्नाथ पाटील लोणी येथील गोपाल जी भाऊ, व शेतकरी संघाचे माजी प्रेसिडेंट शांताराम आबा सपकाळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने