हातेड बुद्रुक येथे १५ वर्षांची अखंड काकडा भजन परंपरा उत्साहात संपन्न!

 हातेड बुद्रुक येथे १५ वर्षांची अखंड काकडा भजन परंपरा उत्साहात संपन्न!






चोपडा,दि.२४(प्रतिनिधी) : तालुक्यातील हातेड बुद्रुक येथे सन २०१० पासून कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत दररोज पहाटे ४ ते ६ या वेळेत समस्त ग्रामस्थ, महिला मंडळ व भजनी मंडळाच्या सहभागातून अखंड काकडा, नामस्मरण, भजन व गवळणीचा भक्तिमय सोहळा सुरू आहे. आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त या उपक्रमाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. यानिमित्त श्री. शरद जगन्नाथ सोनवणे यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा गावाच्या धार्मिक एकात्मतेचे आणि भक्तिभावाचे प्रतीक ठरत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने