धरणगाव रोटरी क्लबच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

 धरणगाव रोटरी क्लबच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

धरणगाव दि.१९( प्रतिनिधी)धरणगाव रोटरी क्लबच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण (इन्स्टॉलेशन) सोहळा शनिवारी (दि. 18) उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार भाऊसो गुलाबरावजी पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोटेरियन डॉ. राजीव शर्मा (पूर्व प्रांतपाल) व रोटेरियन ॲड. रुपेश पाटील (सहाय्यक प्रांतपाल, डिस्ट्रिक्ट 3030) उपस्थित होते.

गणेश वंदना व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मावळते अध्यक्ष प्रा. ए. आर. पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नवनियुक्त अध्यक्ष श्री मनोज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली. मावळते सचिव डॉ. अतुल शिंदे यांनी सचिवपदाचा पदभार श्री सुनील चौधरी यांच्याकडे दिला. कोषाध्यक्ष म्हणून श्री किरण पाटील तर सार्जंट ॲट आर्म्स म्हणून श्री दिनेश माळी यांनी पदभार स्वीकारला.

मावळते अध्यक्ष प्रा. ए. आर. पाटील यांनी गतवर्षातील कार्याचा आढावा घेतला. नवनियुक्त अध्यक्ष श्री मनोज ठाकरे यांनी आगामी वर्षातील विविध सेवाभावी उपक्रमांची रूपरेषा मांडत रोटरीचे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांचा परिचय प्रा. डॉ. अमित पाटील यांनी करून दिला.

यावेळी विशेष कार्याबद्दल श्री ईश्वर शेठ सोनार, श्री चंदन पाटील, श्री अमित पाटील, श्री नितीन पाटील, श्री सुनील चौधरी, श्री किरण पाटील, श्री डी. डी. पाटील व सौ. कांचन महाजन यांचा पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत पाल्यांचा गौरव डॉ. राजीव शर्मा व ॲड. रुपेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये अजिंक्य रवींद्र हरपे, कु. पायल सुनील चौधरी, चि. कुणाल महेंद्र चौधरी, कु. अर्पिता चंदन पाटील, कु. रितिका मनोज ठाकरे, चि. प्रथमेश गजानन साठी, कु. आर्या किशोर येवले व कु. अक्षदा सुनील सावंत यांचा समावेश होता.

मार्गदर्शन करताना ॲड. रुपेश पाटील व डॉ. राजीव शर्मा यांनी रोटरीच्या सेवाभावी कार्याचे महत्त्व विशद केले. प्रमुख अतिथी नामदार गुलाबरावजी पाटील यांनी रोटरीच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करून सामाजिक बांधिलकी जपत अधिकाधिक सेवा प्रकल्प राबविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास सौ. सुरेखा विजय महाजन (उपनगराध्यक्षा, धरणगाव नगरपालिका), श्री सुनील कदम (पोलीस उपनिरीक्षक, धरणगाव), श्री संजय चव्हाण (तालुका आरोग्य अधिकारी), श्री विलास महाजन (नगरसेवक), श्री नितीन अहिरराव (रोटरी क्लब, चोपडा), श्री सी. डी. पाटील (चोपडा) यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

रोटरी क्लबचे सर्व ४१ सभासद व त्यांच्या कुटुंबीयांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी श्री दीपक देवरे (उपकार्यकारी अभियंता) व श्री गुरुप्रसाद लोहार (व्यावसायिक) यांनी रोटरी क्लबचे नवीन सदस्य म्हणून प्रवेश घेतला. आभार प्रदर्शन श्री सुनील चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन श्री नितीन पाटील सर व श्री डॉ. पराग कुलकर्णी सर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने