धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत राबविली गेली पल्स पोलिओ मोहीम
चोपडा दि.३०(प्रतिनिधी ): राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमे अंतर्गत धानोरा प्र. अ. तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 28 जून 2026 रविवार रोजी 0 ते पाच वर्षाचा बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस पासून मोहिमेचा शुभारंग करण्यात आला."दोन थेंब जीवनाचे " या संदेशासह धानोरा आरोग्य विभागाने संपूर्ण कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी 26 पोलिओ बूथ लसीकरण केंद्र उभारून बालकांना पोलिओचे डोस पाजले.पोलिओ मुक्त भारताचे उदिष्ट साध्य करण्यासाठी डॉ उमेश कवडीवाले डॉ सोनाली सरोदे डॉ गौरीशंकर सिसोदिया औषधनिर्माण अधिकारी मोनाली पाटील आरोग्य साहिय्यका मंगला सोनवणे आरोग्य सहाय्यक अभय नाडे आरोग्य सेविका भारती सोनवणे भिकुताई बोडळे सारीका पाडवी परिचारिका हेमलता इंगळे पल्लवी साखरे पर्यवेक्षक प्रमोद पाटील विलास पवार मांगीलाल पावरा विपुल सोनवणे सागर बोराडे प्रवीण ठाकूर गटप्रवर्तक करूना चौधरी एलिझा मोरे तसेच सर्व आशा सेविका या सर्व्यानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
