" महात्मा ते महामानव.. एक शोध.."वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम साजरा
चोपडा दि.२१(प्रतिनिधी)दि १८ एप्रिल २००६ रोजी महात्मा फुले ह्यांच्या द्वीशतकीय जंयती व बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जंयती निमीत्त आक्कासाहेब शरचंद्रिका पाटील नाट्यगृह चोपडा येथे महात्मा ते महामानव.. एक शोध ह्या वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.प्रसीध्द नाट्यकर्मी श्री.शंभु आण्णा पाटील ह्यांच्या अमोघ वाणीतुन सादर करण्यात आला.
शंभु आण्णा पाटील ह्यांनी महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जिवनातील अनेक प्रसंगाचा न उलगडा झाला.जोतीराव फुले ह्यांचा महात्मा व बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा महामानव होन्याचे अनेक पदर उलगडले.शिव ,शाहु फुले, आंबेडकर ह्यांचे विचार च आजच्या काळात किती महत्वाचे हे पटवून देन्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सुनिल पाटील, वाळकी, चोपडा ह्यांच्या संकल्पनेतून करन्यात आले.श्री.अरुण भाई गुजराती (मा.विधान सभा अध्यक्ष) ह्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले.
ह्या प्रसंगी माजी आमदार कैलास पाटील, ऍड.संदीप पाटील अध्यक्ष महात्मा गांधी शिक्षण संस्था, घनःश्याम पाटील माजी चेअरमन चो.सा.का, रमेश शिंदे सभापती न.प.चोपडा,राजु देशमुख नगरसेवक,प्रवीण देशमुख नगरसेवक, इस्माईल बागवान नगरसेवक, नंदकिशोर पाटील,सभापती कृ.उ.बा.,नोमान काझी,स़तोष आहीरे , भैय्या वाडे, गोपाळराव सोनवणे, मिलिंद सोनवणे,रवी वाघ,जियोद्दीन काझी,जमिल कुरेशी, प्रवीण कंरकाळे.सुत्रसंचालन एडव्होकेट उमेश मराठे ह्यांनी केले.
