सेवा निवृत्त बॅंक अधिकारी डी.बी. पाटील यांना पं.नेहरू राज्यस्तर जीवन गौरव पुरस्कार प्रदान
चोपडा,दि.३०(प्रतिनिधी) जे.डी.सी.सी.बँकेतील कार्यकाळात एक अत्यंत सहकार्यशील अधिकारी म्हणून समाज व समाजेतर तालुकावासियांना सुपरिचित गरताडकर डी.बी.पाटील (निवृत्त माजी विभागीय व्यवस्थापक जिल्हा बँक शाखा चोपडा) यांना सपत्नीक छाया पाटील 'तुबा नाज हेल्प मल्टिपर्पज सोसायटी ता.यावल संस्थेचा पंडित जवाहरलाल नेहरू राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित' करण्यात आले आहे .
सहकार्यशील स्वभाव, ओळख - परिचय - मैत्री छंद यामुळे मोठा मित्र स्नेही परिवार असलेले डी.बी.आबा नेहमी, त्यांना शक्य त्या प्रकारे अनेकांना आपल्यापरीने सहकार्यासाठी तयार असतात. खान्देशात विधायक सेवाकार्यासाठी नावलौकिक प्राप्त अमर संस्था, चोपडाचे कार्यकारिणी संचालक तसेच समस्त दोडे गुर्जर समाज संस्थान जळगाव विश्वस्त मंडळ विश्वस्त म्हणून कार्यरत असलेले डी.बी. आबा पाटील यांच्या आता पर्यंतच्या एकूणच सहकार्यशील कार्याची नोंद घेत त्यांना त्यांच्या गुण -कार्य गौरवार्थ हा ४ था पुरस्कार वरोल्लेखित संस्थेतर्फे मनोज देशमुख -उपजिल्हाधिकारी -सरदार सरोवर प्रकल्प नंदुरबार व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.याबद्दल त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
