चोपडा येथे समाजकार्य महाविद्यालय क्षयरोग जनजागृती कार्यक्रम

 चोपडा येथे समाजकार्य महाविद्यालय  क्षयरोग जनजागृती कार्यक्रम

चोपडा दि.२४(प्रतिनिधी): भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथे 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

यावेळी विचार मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी, प्रा.डॉ. राहुल निकम, चोपडा तालुका आरोग्य निरीक्षक विजय देशमुख, तालुका क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक किशोर सैंदाणे, क्षयरोग समन्वयक राहुल सोनवणे, प्रा.डॉ. मारोती गायकवाड, प्रा.डॉ. अनंत देशमुख, प्रा.डॉ. उत्तम सोनकांबळे, प्रा. अनिल बाविस्कर आदी मान्यवर हजर होते. 

       कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा.डॉ. राहुल निकम यांनी प्रास्ताविकातून क्षयरोग जनजागृतीपर कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. क्षयरोग जनजागृती करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तालुका क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक किशोर सैंदाणे यांनी क्षयरोगाची लक्षणे, क्षयरोग होण्याची कारणे, दुष्परिणाम आणि घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. सशक्त समाज निर्मितीसाठी क्षयरोग मुक्त समाज असणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. क्षयरोगामुळे फक्त एका व्यक्तीचे जीवनच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाज व्यवस्था पोखरली जात असल्यामुळे क्षयरोगाला प्रतिबंध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुयोग्य काळजी घेणे आवश्यक असून, क्षयरोग बाधित रुग्णाचे वेळीच क्षयरोगाचे निदान झाले तर, औषधोपचाराने क्षयरोग हा १००% पूर्णतः बरा होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी तालुका आरोग्य निरीक्षक विजय देशमुख आणि क्षयरोग समन्वयक राहुल सोनवणे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

         या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ. उत्तम सोनकांबळे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी वृंद, समाजकार्य महाविद्यालयातील आणि कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने