अजितदादा पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ २८रोजी सद्भावना रॅली
चोपडा दि.२६(प्रतिनिधी) अजितदादा पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ "रन फॉर अजितदादा" या सद्भावना रॅलीचे आयोजन दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजताछत्रपती शिवाजी महाराज चौक चोपडा येथे करण्यात आले आहे.
या रॅलीचा शुभारंभ राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होऊन श्री गाडगेबाबा चौक, थाळनेर दरवाजा राणी लक्ष्मीबाई चौक, मेन रोड, आझाद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून येऊन छ. शिवाजी महाराज चौक येथे समारोप होणार आहे.तरी रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक माजी जि.प.सदस्य सुनिल पाटील (वाळकीकर) यांनी केले आहे.
