पालकमंत्र्यांचे हस्ते शहीद जवान सुनिल पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण

 पालकमंत्र्यांचे हस्ते  शहीद जवान सुनिल पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण  

चोपडा,दि.११(प्रतिनिधी) तालुक्यातील घोडगाव येथे शहीद जवान सुनिल धनराज पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज 11 मे रोजी  करण्यात आले. यावेळी चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लता सोनवणे यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते.

वीर जवानांच्या शौर्याची साक्ष देणारे स्मारकांची उभारणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येणार आहे. या स्मारकांमुळे या शूरवीरांचे जीवनकार्य, देशप्रेम आणि त्याग हा नव्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे. हे स्मारक प्रेरणेचे नव्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत ठरणार असून शहीद कुटुंबियांसाठीही एक मानाचा ठसा असणार आहेअसे  मत पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

अमरजवान सुनिल धनराज पाटील हे 5 ऑगस्ट 2024 रोजी देशसेवा करत असताना शहीद झाले होते. दरम्यान, चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे त्यांचं स्मारक उभारण्यात आले त्यांचा अनावरण  सोहळा आज पार पडला .यावेळी मल्लीकाबाई पाटील (आई), पुनम सुनिल पाटील (पत्नी), मस्वृदी सुनिल पाटील (मुलगी), प्रभाकर पाटील (आजोबा), कैलास पाटील (चुलतभाऊ), संजय कुमार, सत्यपाल साहेब, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, चोपडा बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, प्रकाश बाविस्कर, रावसाहेब पाटील (संचालक मार्केट कमिटी), गोपाल पाटील, विजय पाटील, अॅड. शिवराज पाटील, किरण देवराज, हरीश पाटील (मा. जि.प. सदस्य), विकी सनेर, एम. व्ही. पाटील, सुनिल पाटील, कांतीलाल पाटील, (मंडल अध्यक्ष भाजप), पिटु पावरा (मंडल अध्यक्ष भाजप), यांच्यासह आबादास सिसोदिया, नामदेव पाटील, प्रकाश दादा रजाळे, योगराज बडगुजर, यांच्यासह गावकरी उपस्थित होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने