उद्या चोपड्यात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी बोलवली जम्बो आढावा बैठक.. २५ विभागाचे अधिकारी लावणार हजेरी

 उद्या चोपड्यात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी बोलवली जम्बो आढावा बैठक.. २५ विभागाचे अधिकारी लावणार हजेरी


चोपडा,दि.09(प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघाचे धडाकेबाज आमदार प्रा.अण्णासाहेब चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वच विभागातील अधिकाऱ्यांची जम्बो आढावा बैठक उद्या दिनांक 10 /01/2024 रोजी सकाळी 11;00वाजता नगरपालिका समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे जवळपास 25 विभागाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे .

या बैठकीसाठी पोलीस विभाग  आदिवासी विकास प्रकल्प, अधिकारी राज्य उत्पादन शुल्क अमळनेर विभागीय निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे  जिल्हा परिषद विभाग, पाणीपुरवठा , पंचायत समिती, महा विद्युत वितरण कंपनी  जीवन प्राधिकरण, पशुसंवर्धन बालविकास ,सहाय्यक निबंधक, वनपरिक्षेत्र ,मृद जलसंधारण , उपजिल्हा रुग्णालय , आदी, सर्वच विभागातील  अधिकाऱ्यांना मुद्देनिहाय संक्षिप्त टिपणी तीन प्रतीत घेऊन उपस्थित राहण्याचे पत्रक तहसीलदार भाऊसाहेब  थोरात यांनी काढले आहे .

बैठकीत सर्वच अधिकारी उपस्थित राहणार असल्याने आप आपल्या विभागातील कामाचा लेखाजोखा सादर करण्याची शक्यता असून विराम असलेल्या कामांना जोर मिळण्याचे संकेत आहेत. जनता दरबारातील समस्या कशा ताबडतोब सोडविता येतील यासाठी अधिकाऱ्यांनी  स्वतःस झोकून घ्यावे याकडे आमदार महोदय लक्ष वेधण्याचे बोलले जात आहे. या जम्बो बैठकीची जोरदार तयारी असल्याने काय काय विषय पुढे येतील याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने