*चोपडा रोटरॅक्ट क्लब च्या अध्यक्ष पदी प्रा.दिव्यांक सावंत व सेक्रेटरी पदी मयांक जैन*
चोपडा दि१८( प्रतिनिधी) येथील रोटरी क्लब च्या युवकांची शाखा असलेल्या "रोटरॅक्ट क्लब ऑफ चोपडा" ची कार्यकारिणी दि.९ जुलै २०२२ रोजी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीत प्रा.दिव्यांक सावंत यांची पुन्हा सर्वानुमते अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष पदी प्रितेश पाटील, सचिव मयांक जैन व खजिनदार मयुरेश जैन यांची निवड करण्यात आली.पदग्रहण सोहळा दि.९ जुलै रोजी शहरातील समर्थ पॅलेस येथे पार पडला.सोहळ्यात विधानसभेचे माजी अध्यक्ष मा.अरुणभाईसाहेब गुजराथी,प्रमुख पाहुणे रोटे.महेश मोकालकर,मा.घणश्याम अण्णा पाटील,रोटे.नितीन अहिरराव, नवनिर्वाचित रोटरी अध्यक्ष रुपेश पाटील, सचिव गौरव महाले व तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.२०२१-२०२२ या वर्षात रोटरॅक्ट क्लब चोपडा तर्फे कोकण पुरग्रस्तांना मदत,रक्तदान शिबीर, वृक्षारोपण असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.तसेच याचप्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम या वर्षातही क्लब तर्फे राबविण्यात येतील अशी माहिती क्लबचे नवनिर्वाचित कार्यकारिणी तर्फे देण्यात आली.