लासुर येथीलआदीवासी बांधवाचे आज२६ जानेवारीला होणारे आमरण उपोषणास तुर्त स्थगित*
चोपडा दि.२६(प्रतिनिधी कैलास बाविस्कर)मा.कार्य सम्राट आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातुन आणि आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे रावेर लोकसभा सहसंपकॕ प्रमुख यांच्या विनंती वरुन दि.२६जानेवारीस होणाऱ्या आदीवाशी बांधवाच्या आमरण उपोषणास तुतॕ स्थगित करण्यात आले आहे
हे उपोषण २०फेब्रुवारीपयॕत करु नये अशी विनंती मा.तहसीलदार अनिल गावीत साहेब यांनी केली आहे त्या विनंतीला मान देऊन उपोषणकर्ते यांनी आपले उपोषण तूर्त मागे घेतले आहे.
ह्या बैठकीस मा.गटविकास अधिकारी चोपडा लोकनियुक्त संरपच जनाताई सुकदेव माळी लासुर ग्रामविस्तार अधिकारी चौधरी बापुसो कैलास बाविस्कर समन्वय पुनिॕलोकन समीती सदस्य चोपडा नगररचनाकार श्री उगले ,तडवीरावसाहेब तलाठी लासुर ,पिताराम पावरा ,दिलीप पावरा आदि उपस्थित होते