स्निग्धा जोशी यांना जिल्हास्तरीय क्रिडा नारीशक्ति पुरस्कार जाहिर
साकळी ता.यावलदि.०५ (वार्ताहर ) साकळी येथील रहीवाशी व यावल येथील माध्यमिक कन्या शाळेतील शिक्षिका सौ.स्निग्धा प्रमोद जोशी यांना जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ व जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ यांच्या सयुक्त विद्यमाने देण्यात येणारा जिल्हास्तरीय क्रीडा नारीशक्ति पुरस्कार जाहिर करण्यात आला असुन नवरात्रीचे औचित्य साधुन दि १० ऑक्टों. २१ रविवार रोजी जळगाव येथील सदगुरु शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या सभागृह,गणेश कॉलनी येथे विविध मान्यवराच्या उपस्थित सन्मानीत करण्यात येणार आहे.
क्रीडाशिक्षक व क्रीडासंचालक हे शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयांच्या अध्यापना
बरोबर स्पर्धेसाठी खेळाडू तयार करणे, त्यांचा सराव करुन घेणे,त्यांना स्पर्धेसाठी बाहेर घेऊन
जाणे व क्रीडा क्षेत्रात शाळेचा,महाविद्यालयाचा,संस्थेचा गौरव वाढविण्यासाठी प्रयत्नशील
असतात अश्या शिक्षकांचा गौरव व्हावा या उदात्त हेतुने जिल्हास्तरीय क्रीडा नारीशक्ति सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे पत्रक जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघचे अध्यक्ष डॉ.प्रदिप तळवेलकर,कार्यध्यक्ष प्रशांत कोल्हे,सचिव राजेश जाधव यांनी पत्रका द्वारे कडविले आहे या पुरस्कारा बद्दल सौ स्निग्धा प्रमोद जोशी यांचे स्तरातून स्वागत होता आहे.