स्व. बळीराम दादांना चोपडा काँग्रेसची श्रद्धांजली

 


चोपडा दि. 26 (प्रतिनिधी) --चोपडा तालुक्याचे माजी आमदार माननीय चंद्रकांत जी सोनवणे यांचे पिताश्री तथा विद्यमान आमदार सौ लताताई सोनवणे यांचे सासरे बळीराम दादा सोनवणे यांचे नुकतेच निधन झाले. चोपडा शहर आणि तालुका काँग्रेसतर्फे त्यांना दिनांक 26 जून 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात चोपडा येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री के .डी .चौधरी सर यांनी बळीराम दादांच्या कार्याचा गौरव करून, दादा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे एक प्रेरणास्थान होते असे नमूद केले. चोपडा शहर आणि तालुका काँग्रेसच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना यावेळी चोपडा सूतगिरणीचे संचालक राजेंद्र भास्करराव पाटील, प्राध्यापक श्री कांतीलाल सनेर ,चोपडा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण सोनवणे ,श्री रमाकांत सोनवणे ,श्री इलियास पटेल, हमीदखा पठाण श्रीमती फातिमा पठाण, देवकांत चौधरी, जितेंद्र चौधरी आदी काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने