महापौर महाजन, उपमहापौर पाटलांनी बोलावली* आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांची बैठक..घंटागाडी वेळेत नेण्यासह गटारी, चेंबर स्वच्छतेचा प्रश्न गांभीर्याने हाताळण्याचे आदेश**




*जळगाव, ता. 29(प्रतिनिधी) :* शहरातील विविध प्रभागांतील परिसरात घंटागाडी वेळेत न येणे, गटारींची स्वच्छता न होणे, तसेच विविध व्यापारी संकुलांच्या परिसरातील चेंबर स्वच्छतेसह कॉलन्यांतर्गत असलेल्या रस्त्यांच्या साफसफाईप्रश्नी नागरिकांकडून ‘महापौर सेवा कक्षा’सह महापौर व उपमहापौरांकडे थेट तक्रारी करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले होते. त्याची गंभीरपणे दखल घेत आज सोमवार, दि. 28 जून 2021 रोजी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, मुकादम यांची दुपारी महापौर दालनात बैठक बोलावून त्यात पावसाळ्याचे दिवस आणि या दिवसांत निर्माण होणार्‍या विविध साथीच्या आजारांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शहरातील त्या-त्या प्रभागात घंटागाडी वेळेत नेण्यासह गटारी, चेंबर स्वच्छतेचा प्रश्न गांभीर्याने हाताळण्याचे लक्षात घेऊन तशा पद्धतीने कार्यवाही करावी, असे आदेश महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी संबंधितांना दिले.


आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.पवन पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री.श्याम गोसावी, आरोग्य अधीक्षक श्री.अत्तरदे, श्री.धांडे, श्री.इंगळे यांच्यासह आरोग्य निरीक्षक, कर्मचारी व मुकादम उपस्थित होते.


घंटागाडी वेळेत न येणे, गटारींची स्वच्छता न होणे, तसेच विविध व्यापारी संकुलांच्या परिसरातील चेंबर स्वच्छतेसह कॉलन्यांतर्गत असलेल्या रस्त्यांच्या साफसफाईप्रश्नी नागरिकांकडून ‘महापौर सेवा कक्षा’सह महापौर व उपमहापौरांकडे थेट तक्रारी करण्याचे प्रमाण वाढत चालले होते. त्याची गंभीरपणे दखल घेऊन आज सौ.जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, मुकादम यांची महापौर दालनात बैठक बोलावून त्यात पावसाळ्याच्या दिवसांत निर्माण होणार्‍या विविध साथीच्या आजारांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शहरातील त्या-त्या प्रभागात घंटागाडी वेळेत नेण्यासह गटारी, चेंबर स्वच्छतेचा प्रश्न गांभीर्याने हाताळण्याचे आदेश संबंधितांना दिले. तसेच नागरिकांकडून याच प्रश्नांसंदर्भात पुन्हा तक्रारी आल्यास त्याची गंभीरपणे दखल घेऊन संबंधितांवर कार्यवाही होईल, अशी जाणीवही यावेळी संबंधितांना करून देण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने