पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

 पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

चोपडा,दि.२७(प्रतिनिधी): येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिन विविध उपक्रमांनी उत्साहात व सन्मानाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, २६ नोव्हेंबर रोजी साजरा होणारा संविधान दिन आपल्याला लोकशाहीची खरी ताकद आणि जबाबदारीची जाणीव करून देतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य आणि न्याय यांचे भक्कम कवच दिले आहे. संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून देशाला एकात्मतेच्या धाग्यात बांधणारा आणि सर्वांगीण प्रगतीची दिशा दाखवणारा प्राणवायू आहे. या दिनानिमित्त संविधानातील मूल्यांचे जतन करणे आणि कर्तव्यनिष्ठेने देश घडवणे, हीच खरी राष्ट्रसेवा आहे.

          या प्रसंगी प्रा. नंदलाल वाघ यांनी भारतीय संविधान दिनाचे महत्त्व तसेच २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी व त्याचे राष्ट्रीय सुरक्षेवरील परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (प्रस्तावनेचे) सामूहिक वाचन केले.

     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली चौधरी, अजय सैंदाणे, योगराज रायसिंग, जितेंद्र महाजन, दिवाकर बाविस्कर, सौरभ कुलकर्णी, संजय भादले, आशिका पाटील, विजय पाटील, वेलसिंग बारेला आणि गजानन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने