श्री इंद्रदेवजी महाराज आश्रमातील आयोजित श्रीमद् भागवत कथेचा उद्या शेवटचा दिवस
चोपडा दि.1(प्रतिनिधी)श्री श्री 1008 श्री महामंडलेश्वर डॉक्टर संत इंद्रदेवजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त पारोळा तालुक्यातील सावखेडा येथे श्री इंद्रदेवजी महाराज आश्रमात श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच 51 कुंडी लक्ष्मी यद्य देखील होत आहे
हा कार्यक्रम 27 जानेवारीपासून ते 2 फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे उद्या दिनांक 2 रोजी कार्यक्रमाच्या समारोप होत आहे. तरी श्रीमद् भागवत कथेचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
