*शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथे शांताराम महादु भिल काल झालेल्या मुसळधार पावसात अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ*
शिंदखेडा (तालुका प्रतिनिधी यादवराव सावंत) तालुक्यातील डोंगरगाव परिसरात मुसळधार पावसामुळे येथील मोलमजुरी साठी रहिवासी शांताराम महादु भिल मासे पकडण्यासाठी सोनवद धरणावर संध्याकाळी गेलेला असताना अंगावर वीज पडुन दुर्दैवी प्रसंगी त्यास सोनगीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.हया दुर्दैवी मृतामुळे डोंगरगाव व परिसरात पहिल्यांदा घटना घडली असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.सदर मृत पावलेला मुळ गाव मेथी चा रहिवासी असून तो मोलमजुरी साठी आपल्या सासरी रतिलाल एकनाथ भिल यांच्या कडे आदिवासी वस्ती मध्ये रहिवास करून राहत होता.त्याच्यामागे पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.कुटुबातील सदस्यांना पुढील उदरनिर्वाह करिता शासनस्तरावरुन मदत मिळावी हयासाठी गावातील माजी पंचायत समितीचे सभापती व धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ा बॅकेचे संचालक प्रकाश पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून कुटुंबातील सदस्य यांना धीर देत सात्वन केले. हयावेळी डोंगरगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.