नाशिक दि.30 (प्रतिनिधी)
दिंडोरी महाजे येथील जिल्हा परिषद शाळेत स्वराज्य परिवाराच्या वतीने भव्य वृक्षरोपण*
स्वराज्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे* यांच्या मार्गदर्शनाने व कल्पनेने कोरोना काळात निसर्गवाशी झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ महाजे जिल्हा परिषदेच्या परिसरात भव्य वृक्षरोपण करून *दिवंगत व्यक्तींना आदरांजली वाहण्याचा स्तुत्य व प्रेरणादायी वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वराज्य परिवाराचे सचिव विनायकदादा सूर्यवंशी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास पाटील सर, स्वराज्य परिवाराच्या महिला प्रमुख मोहिनी भगरे, डॉ. जवाहर बेदमुथा, ज्येष्ठ नेते गुलाबराव गांगुर्डे, एड. शिवाजी शेळके, पोलीस अधिकारी शेखरभाऊ फरताळे, समाजसेविका जयश्रीताई जाधव ,योगिता सोनवणे, चारुशीला पाटील, दिपक तायडे,सरपंच रूपाली भोये, उपसरपंच आशाताई गुंबाडे ,सदस्य कमलाबाई भुसारे, प्रतिभा गावित, महेंद्रजी पवार , रेखा नेहरे, वाल्मीक शिंदे, सोमनाथ बर्डे,किरण सूर्यवंशी,प्रकाश उखाडे,खंडेराव डावरे,संजू भाऊ थोरात हे विचारपीठावर उपस्थित होते ,याप्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते दिवंगत झालेल्या व्यक्तींच्या नावाची पाटी प्रत्येक झाडाला लावून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे यांनी आपल्या मनोगतात मार्गदर्शन केले की स्वराज्य परिवार समाजातील आदर्श विचार असून विचाराच्या माध्यमातूनच जिल्ह्यात अनेक ठिकाणी शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, आरोग्य, जलसंवर्धन, वृक्ष संवर्धन काम करण्यासाठी कटिबद्ध आहे, यातूनच देशाला निर्माण झालेले ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन व पावसाचे चांगले भविष्यात आगमन व्हावे, या उद्देशाने वृक्षारोपण करण्याचा आदर्श उपक्रम राबवणे गरजेचे आहे, जंगल संपत्ती ही देशातील नैसर्गिक संसाधन आहे आणि हे संसाधन वाढविणे स्वराज्य परिवाराचे माध्यमातून अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले जाते, कारण वृक्ष हे आपले सर्वांचे प्रेरणास्रोत, जीव स्रोत, ऊर्जा स्त्रोत असल्यामुळे त्यांची लागवड होणे आवश्यक आहे, ज्या परिसरात जल, जमीन, जंगल नष्ट होऊन मानव जात प्राणी - पक्षी यांचे समूह धोक्यात येऊ लागले आहे त्यांच्या प्रजाती वाढविण्यासाठी ही संवर्धन करणे महत्त्वाचे आहे ,वृक्षांमुळे भौगोलिक परिस्थितीची नैसर्गिक सुंदरता अधिक मनोरम बघायला मिळते याचा मुख्य उद्देशाने हे जिल्ह्यातील भव्य वृक्षरोपण करून आम्ही निसर्गाच्या सानिध्यातून मुक्त होण्याचा एक अनोखा प्रयत्न करत आहोत.
याप्रसंगी *मोहिनी भगरे व सरपंच रूपाली सोमनाथ भोये* यांनी आपले मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वराज्य परिवाराचे तालुकाप्रमुख नामदेव जोपळे सामाजिक कार्यासाठी यांचा विशेष सत्कार करण्यात आला, या याप्रसंगी शाळेच्या *शैक्षणिक विकासासाठी भाऊसाहेब बेंडकुळे* यांनी अकरा हजाराचे रोख मदत करून मोठा आधार विद्यार्थ्यांसाठी दिला तसेच गावकरी व पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमासाठी राजेंद्र पारधी, भाऊसाहेब भोंडवे, विनोद भाऊ बिरारी,शांताराम नेहरे, विजय मोराडे, विश्वजीत राणे , सुप्रिया गावित, कविता डावरे,केशव भोये, रविंद्र साळुंखे,मोहनभाऊ गरुड,वसंत भोईर,सुनिल शिंदे,आदित्य पवार, प्रमोद गणपत कोंगे, विजय कोंगे, सावळीराम भुसारे, जिजाबाई भोये, आर .व्ही .मोरे ,ओम निकम हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरसट सर व आभार मुख्याध्यापक निकुंब सर यांनी मानले.
--------------------------------