एस.एन.आर.जी.इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने अनवर्दे खुर्द‌‌‌, बुधगाव व जळोद भागात वृक्षारोपण

 

एस.एन.आर.जी.इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने अनवर्दे खुर्द‌‌‌, बुधगाव व जळोद भागात वृक्षारोपण

चोपडा दि.१७(प्रतिनिधी)चोपडा तालुक्यात घोडगाव येथील एस.एन.आर.जी.इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने अनवर्दे खुर्द‌‌‌, बुधगाव व जळोद गाव परिसरात वृक्षारोपणचा कार्यक्रम सोत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
चोपडा पीपल्स बँकेमार्फत चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा तालुकाभर १ लाख  वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.प्रत्येक गावात  हजार झाडे लागवडीचा मानस असून त्या अनुषंगाने एस.एन.आर.जी.इंग्लिश मिडीयम स्कूलने अनवर्दे, बुधगाव व जळोद भागात आज गावकऱ्यांना सोबत घेऊन वृक्ष लागवड करण्यात आली.यावेळी प्रिंसीपॉल जेनिफर साळूंखे,व्हाईस प्रिन्सिपॉल कल्पेश साळुंखे, सरपंच सचिन शिरसाठ, उपसरपंच महेश पवार, पोलिस पाटील मिलिंद शिंदे, सरपंच पवित्रा रविंद्र सोनवणे, पोलिस पाटील बापूराव धनगर,उमेश वाघ,व तिन्ही गावांतील गावकरी आणि इंग्लिश मिडीयम चे शिक्षक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने