अमळनेरातील कोळी जमातीच्या ठिय्या आंदोलनास सकल मराठा समाजाचा पाठिंबा..तात्काळ दाखले द्या,अन्यथा आमरण उपोषण करणार..जगन्नाथ बाविस्कर

 अमळनेरातील कोळी जमातीच्या ठिय्या आंदोलनास सकल मराठा समाजाचा पाठिंबा..तात्काळ दाखले द्या,अन्यथा आमरण उपोषण करणार..जगन्नाथ बाविस्कर 

अमळनेर/चोपडा दि.१७(प्रतिनिधी):-तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळाले पाहिजेत, यासाठी चोपडा व अमळनेर तालुक्यातील आदिवासी कोळी जमातबांधवांतर्फे दि. १५ जुलै पासून अमळनेर येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. ह्या आंदोलनास अमळनेर येथील सकल मराठा समाजाचा व प्रकाशभाई युवा मंचने जाहीर पाठिंबा दिला आहे

आज आंदोलनाचा ४ था दिवस आहे. तरिही संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नाही. यादरम्यान प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी आंदोलनकर्त्यांसोबत मागण्यांबाबत चर्चा केली. परंतु अजुनही परिस्थिती जैसे थेच आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटिल यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन प्रांताधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून दाखले देण्याबाबत सूचना केल्यात. संबंधित विभागाने प्रलंबित व नवीन दाखल होणाऱ्या प्रकरणांना तात्काळ टोकरेकोळीचे जातप्रमाणपत्र द्यावेत, अन्यथा ठिय्या आंदोलनातच तीव्र आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे आंदोलनकर्ते जगन्नाथ बाविस्कर चोपडा व मधुकरगुरु सोनवणे अमळनेर, प्रवर्तन संस्थेचे अध्यक्ष मदन शिरसाटे यांनी सांगितले आहे. याप्रसंगी मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख, प्रकाश भाई, सुरेश पाटील, नरेंद्र पाटील, अमित ललवाणी, हर्षल देशमुख, प्राध्या.किरण पाटिल, विधीज्ञ प्रशांत संदानशिव, योगेश कोळी यांचेसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने