चोपडा जेष्ठ नागरिक संघाची विकासासाठी आमदारांकडे निधीची मागणी


चोपडा जेष्ठ नागरिक संघाची विकासासाठी आमदारांकडे  निधीची मागणी 

चोपडा दि.९(प्रतिनिधी) येथील जेष्ठ नागरिक संघ चोपडा यांचे वतीने नारायण वाडीतील विठ्ठल मंदिर समोरील संघाच्या मालकीच्या जागेत स्वागत गेट सह कंपाऊंड वॉल तसेच मोकळ्या ग्राऊंडवर सिमेंटचे पेव्हर ब्लॉक या विकास कामांसाठी आमदार निधीतून दहा लाख रुपयांची  शिवसेना आमदार सौ. लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचा राजेंद्र गंगाधर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात स्वागत करून मागणी करण्यात आली. 

या वेळी सदर मागणीचे निवेदन ही देण्यात आले. सौ. लताबाई चंद्रकांत सोनवणे यांनी चोपडा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व्ही एच करोडपती, सचिव प्रमोद डोंगरे, जयदेव देशमुख, यशवंत जडे, दिलीप पाटील, से नि तलाठी एम बी साळुंखे, जे एच नेरपगारे, प्रभाकर बैरागी , सुभाष पाटील यांना लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे राजेंद्र पाटील व उपस्थित शिवसेना कार्यकर्ते यांचे समक्ष आश्वासनही दिले. 

सर्वानी आश्वासना बद्दल समाधान व्यक्त करून विकासकामे पूर्ण झाल्यास लोकार्पणासाठी लवकरच चोपडा जेष्ठ नागरिक संघाचा मार्ग मोकळा होईल असेही सूचित केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने