प्रगती माध्यमिक शाळेत एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम संपन्न*

 


*प्रगती माध्यमिक शाळेत एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम संपन्न*

     जळगावदि.०४ ( प्रतिनिधी)    विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चालविलेल्या प्रगती माध्यमिक शाळेत शंभर दिवस वाचन अभियान उपक्रम अंतर्गत एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपला भारत देश सुजलाम सुफलाम आहे. भारत देश विविधतेने नटलेला आहे. सर्व धर्म समभाव, चालीरीती, वेशभूषा, खानपान, बोलीभाषा, याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. भारत देशाची एकता व एकात्मता दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक प्रांत, भाषा, वेशभूषा सादरीकरण केले. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमा अंतर्गत प्रश्नमंजुषा कवीश भालेराव या विद्यार्थ्याने सादर केले. कविता भाषण प्रतिक नेवे या विद्यार्थ्यांनी सादर केले. शिवाजी महाराज यांची भूमिका गौरव पाटील या विद्यार्थ्यांने सादर केली. महाराष्ट्र ,गुजरात, मद्रास, या प्रांतीय वेशभूषा विद्यार्थ्यांनी संवाद प्रकटीकरनातून सादर करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण हे समाजाच्या उन्नतीचे सर्वात महत्वाचे साधन आहे असा मौलिक संदेश देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची भूमिका पायल सुनील पाटील या विद्यार्थ्यांनी दिला. आपल्या भारताचे आकर्षण परदेशी राष्ट्रांना देखील आहे म्हणून परदेशी पर्यटक व्यक्ती म्हणून भारताची गौरव महिमा इंग्रजी बोलीतून नकुल वाणी या विद्यार्थ्याने सांगितले. शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव म्हणून सर्व धर्मीयांना  समानतेची वागणूक दिली व माता-भगिनींना सन्मान केला आमचे राष्ट्र हिंदवी राष्ट्र म्हणून तेवत ठेवणाऱ्या शिवाजी महाराजांची भूमिका गौरव पाटील या विद्यार्थ्याने साकार केली.

      सदरील कार्यक्रमाकरिता प्रगती बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती कुलकर्णी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रगती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा पाटील, सुवर्णा पाटील मिस, श्री सुभाष शिरसाट सर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.

        एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाचे सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांचे गुणगान आणि कौतुक विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री प्रेमचंद जी ओसवाल यांनी केले तर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व कल्पकतेला दाद देऊन प्रशंसा संस्थेच्या अध्यक्ष मंगलाताई दुनाखे यांनी केले. संस्थेचे सचिव सचिन दुनाखे यांनी विद्यार्थ्यांना शाबासकी दिली. भारताची एकता व  एकात्मता, राष्ट्राची अखंडता जोपासण्याचे काम एक भारतीय नागरिक म्हणून विद्यार्थ्यांनी करावे असा मौलिक संदेश मा. मनीषा पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.

       एक भारत श्रेष्ठ भारत या विषयाची प्रस्तावना श्री अनिल वाघ सर यांनी केली. सूत्रसंचालन जागृती पाटील या विद्यार्थिनीने सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री दीपक बारी सर, सुभाष शिरसाठ सर, यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने