भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे घोडगाव ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा..!*
घोडगाव ता. चोपडा..दि.०४(परिसर प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी):येथील मराठी शाळेच्या पूर्वेकडील गावठानावर राहणाऱ्या शेतमजुरांची रहिवासी जागा नावे करावी म्हणून लालबावटा शेतमजूर युनियन व भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आज रोजी दुपारी साडेअकरा वाजता घोडगाव ग्रामपंचायत वर धडक मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व कम्युनिस्ट पक्षाचे नेते काम्रेड अमृत महाजन, का शांताराम पाटील, शेतमजूर युनियनचे सचिव का गोरख वानखेडे यांनी केले.
याबाबत सविस्तर असे की, घोडगाव येथील मराठी शाळेच्या पूर्वेकडील गावठाणवर गेल्या 35/ 40 वर्षा पासून 25/30शेतकरी शेतमजूर कुटुंबे आपली घरे बांधून राहत आहेत सदर जागा नावे करण्यात आली नाही . घोडगाव ग्रामपंचायतीने 2009 साली सदर जागा रहिवाशांचे नावावर करण्यासाठी काही नावांसह ठरावही केलेला आहे.त्यातच यावर्षी लोकांना घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायतीने छानणी केली असता त्यात हे सर्व शेतमजूर शेतकरी पात्र आहेत. परंतु त्यांना नावे जागा नसल्यामुळे घरकुल लाभ देता येणार नाही.असे सांगण्यात आले. त्यामुळे या शेतमजूर शेतक-यांमध्ये खलबल निर्माण झाली म्हणून त्यांनी या प्रश्नी पाठपुरावा करण्यासाठी घोडगाव ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. त्यावेळी मोर्चे करमचारी तर्फे ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या राहत्या घराच्या जागा नावे करा. घरकुले बांधून द्या. गावातील ड यादीतील लोकांना घरकुल बांधून द्या याविषयी ग्रामपंचायत ची ताबडतोबीने मिटिंग बोलवून ठराव करा. आदी मागण्यांचे निवेदन माननीय सरपंच इंदुबाई शामराव भिल व ग्राम विकास अधिकारी एस वी सोनवणे यांना सादर करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सदस्य संतोष उत्तम कोळी सुनील रामकृष्ण कोळी रावसाहेब पाटील श्यामदास बिल गोपाल भोई, कर्मचारी द्वय दिनेश पाटील ज्ञानेश्वर सुतार आदि सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच इंदुबाई भिल यांना निवेदन दिले. असता असले की, आम्हास या प्रश्नाची जाणीव आहे ग्रामपंचायत मध्ये ठराव करून त्याप्रमाणे आम्ही जिल्हा परिषदेला ठराव पाठवू यापूर्वीही या जागेपैकी काही जागा जिल्हा परिषदेने कै. गुलाबराव भिकारी पाटील सरपंच असताना गावठाण कडे वर्ग केली होती. तसाच प्रयत्न करता येईल. असेही संतोष कोळी यांनी सांगितले. या आश्वासनाने व कागदपतरी माहिती ग्रामपंचायतीने दिल्यामुळे शेतमजुरा त समाधान पसरले . या मोर्चामध्ये सर्वश्री विश्वास गोरख पाटील इरफान बाळू कोळी रेखाबाई पाटील , ईश्वर कोळी ,फुलसिंग बारेला, सतीश पारधी ,देवसिंग भिल, रवींद्र भोई ,मंगला पाटील, कमलबाई भोई ,समाधान कोळी, सुरेश कोळी, दिलीप कोळी, सिंधुबाई कोळी, रवींद्र भोई आदि 50 शेतकरी मजुरांचा समावेश होता असे लाल बावटा शेतमजूर युनियन ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे .