चिमुकल्यानी साकीनाका येथे कागदी फुटयांतून साकारले किल्ले




चिमुकल्यानी साकीनाका येथे कागदी फुटयांतून साकारले किल्ले 


मुंबई दि.१८(शांताराम गुडेकर) आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज(दि.१९ फेब्रुवारी )तारखे प्रमाणे जयंती साजरी करण्यात आली. जयंती दिनी शाळेला शनिवारी सुट्टी असल्याने साकिनाका येथील समता विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थानी सुट्टीच्या एक दिवस आधी शाळेत कागदी फुटयांतून किल्ले साकारले. यात इयत्ता ४ थी ते ७ वी च्या विद्यार्थानी सहभाग घेतला. शाळेचे कार्याध्यक्ष राजेश सुभेदार यांच्या संकल्पनेतून शिवजयंती साजरी करण्यात आली.

             कागदी फुटयांतून विद्यार्थानी शिवनेरी , राजगड , प्रतापगड , सिंधुदुर्ग आदी किल्ले साकारले तर कागदाच्या ढाल व तलवारी देखील बनवण्यात आल्या आहेत. विद्यार्थानी साकारलेले हे किल्ले आज शनिवार १९ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी कुसुमाग्रज यांच्या जयंती दीन अर्थात मराठी भाषा दिना पर्यंत प्रदर्शनाकरिता ठेवण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष राजेश सुभेदार यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने