आजंती सिम गाडी सुरू न झाल्यास येत्या शुक्रवारी मोहिदा फाट्यावर रस्ता रोको चा ग्रामस्थांचा इशारा..
चोपडा दि.३(प्रतिनिधी).. तालुक्यातील चोपडा व डोदा अजांतीसिं एसटी अनेक वर्षापासून सुरु आहे .. कोरॉना काळात काही काळ ही सेवा बंद होती. गाव तिथे एसटी या परिवहन मंडळाचे तत्वानुसार बस गावापर्यंत नित्यनेमाने सुरू होती. कोरोना काळ संपल्यानंतर मात्र एसटी परिवहन मंडळाने ग्रामीण भागात बस सेवा सुरू केली असता अजंता गावाचा रस्ता खराब असल्याचे कारण दाखवून तेथे बस सुरू केली नाही परंतु ग्रामस्थांनी श्रमदान व पंचवीस हजार रुपये खर्च करून वडोदा अजनी सीम रस्ता दुरुस्त केला व चार वेळा चोपडा आगाराला ग्रामपंचायतीने लेखी विनंती कळवले की अजांतिसिम बड सुरू करा. प्रत्यक्ष भेटी घेतल्या परंतु ही गाडी सुरू केली नाही. दिनांक 1 नोव्हेंबर रोजी रात्री वडोदा गावी गाडी मुक्कामी थांबले वर त्यातील अजांती गावी जाणाऱ्या बाळंत पण झालेल्या गरीब मातेस लहान बाळ घेऊन पायी यावे लागले आणि अकरा वाजता त्या मोठ्या जोखमिंने पोहचल्या. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये परिवहन मंडळ चोपडा आगार विषयी तीव्र नाराजी निर्माण झाली. काल रोजी ग्रामस्थांची बैठक कम्युनिस्ट नेते का अमृत महाजन यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.असता चोपडा आगाराने बस सुरू न केल्यास येत्या शुक्रवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी मोहिदा फाट्यावर सकाळी आठ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा चोपडा आगारास देण्यात आला आहे त्या वेळी झालेल्या सभेत सर्वश्री सरपंच सिंधुबई सुखदेव भील उपसरपंच मनीषा लादू पाटील शिवाजी पाटील राजेंद्र पाटील माजी, सरपंच विजय पाटील धोंडू दुकानदार ,दगडू पाटील, हर्षल पाटील ,सुखदेव भिल,संजय पाटील, पाटील हरी पाटील विजय पंढरीनाथ पाटील रुप्सिंग पाटील ,राहुल मोरे ,वसंत मोरे वासुदेव कोळी ,दशरथ पाटील, दगडू पाटील, राजेंद्र पाटील ग्रामपंचायत कर्मचारी आदी अवरजून हजर झाले होते