प्रगती माध्यमिक शाळेत हिंदी दिवस संपन्न.
जळगाव दि.14(प्रतिनिधी) विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चालविलेल्या प्रगती माध्यमिक शाळेत आज 14 सप्टेंबर हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून व्यासपीठावर विराजमान प्रगती विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शोभा फेगडे मिस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रगती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा पाटील मॅडम होत्या. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी लाड या विद्यार्थिनीने केले. प्रस्तावना म्हणून गायत्री बागुल या विद्यार्थिनीने केले. सायली चौधरी या विद्यार्थिनीने आभार व्यक्त केले. प्रगती माध्यमिक शाळेत ऑनलाइन ऑफलाइन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्नेहल चौधरी या विद्यार्थिनीने स्वरचित कविता सादर केली. दीप्ती बारिया विद्यार्थिनीने हिंदी दिवसाचे महत्त्व विशद केले. तसेच प्रगती विद्या मंदिर शाळेच्या शिक्षिका पवार मॅडम यांनी हिंदी दिनानिमित्त गीत गायन केले. प्रगती माध्यमिक शाळेच्या शिक्षिका भाग्यश्री तळेले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दीपक बारी व अनिल वाघ यांनी हिंदी दिनाचे औचित्य साधून विषय शिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. ह्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शोभा फेगडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण म्हणून मनीषा पाटील यांनी सांगितले. विद्या वर्धनी शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री प्रेमचंद जी ओसवाल व संस्था अध्यक्ष मंगलाताई यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हिंदी दिनाच्या यशस्वितेकरिता श्री सुभाष शिरसाठ सर, हर्षदा पाटील मॅडम, प्रियंका वाणी मॅडम, यांनी अनमोल सहकार्य केले.
